बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊन लागू केला. यावेळी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. कोरोनामुळे राज्यातील मॉल बंद आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी, शहरातील काही मॉल्स काही बंदी घालून पुन्हा सुरू करण्याचा सरकार विचार करीत आहे आणि लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.
“मॉल (शॉपिंग सेंटर) असोसिएशनचे सदस्य मला भेटले आहेत. मी माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी याबद्दल चर्चा करेन. आम्ही काही प्रतिबंधांसह काही सवलती विचारात घेत आहोत. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मी त्यांना सांगितले आहे की मी माझ्या कॅबिनेट सहकाऱ्यांशी चर्चा करेन आणि लवकरच निर्णय घेईन, ” असे येडीयुरप्पा म्हणाले.