समुद्र किनारा, लाटांचा आवाज आणि मंद वाहणाऱया वाऱयांदरम्यान सुरू असलेला वर्ग. हे कुठल्या चित्रपटातील दृश्य नसून स्पेनच्या शाळेतील आहे. येथील शाळेने समुद्र किनाऱयावरच वर्ग भरविणे सुरू केले आहे. दीर्घ काळानंतर शाळेत पोहोचलेल्या मुलांना मोकळय़ा हवेत श्वास घेता यावा आणि मानसिक ताण संपविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. स्पेनच्या मर्सिया येथील खासगी शाळेने ‘प्रेश एअर’ नावाचा पुढाकार हाती घेतला आहे.
या अंतर्गत 3-12 वर्षांपर्यंतच्या मुलांचे वर्ग समुद्रकिनाऱयावर आयोजित करण्यात आले आहेत. येथे शिक्षणासह महामारी आणि त्यामुळे होणाऱया नुकसानीबद्दल सांगण्यात येत आहे. समुद्रकिनाऱयावर शिकणाऱया मुलांना मोठी मजा येत आहे. ते शिकविण्यात आलेले विषय लवकर आत्मसात करत असल्याचे उद्गार इंग्रजीचे शिक्षक जुआन फ्रान्सिस्को मार्टिनेज यांनी काढले आहेत.
समुद्र किनाऱयावर आयोजित वर्गांमध्ये मुलांना सोशल डिस्टंन्सिंगसह बसविण्यात येत आहे. 20 मिनिटांच्या वर्गानंतर नवनवे उपक्रम करविण्यात येत आहे. मासे पकडणे आणि जाळे फेकणेही देखील शिकविण्यात येत आहे.
मुलांना लाइव्ह क्लासेसही देण्यात येत आहेत. कार्टून कॅरेक्टर आणि कहाणींच्या माध्यमातून त्यांना शिकविण्यात येत आहे. मुले कहाणींद्वारे लवकर शिकत असल्याचे शिक्षकांचे मानणे आहे. मुलांना शिकविण्याची ही पद्धत उपयुक्त ठरत आहे.