प्रतिनिधी /काणकोण
मोखर्ड, काणकोण येथील श्री अश्वत्थ नारायण देवालयाच्या वार्षिक शिमगोत्सवाला पारंपरिक नमनाने सुरुवात झाली असून श्री अश्वत्थ नारायण देवाला नारळ अर्पण केल्यानंतर आरतीने या उत्सवाची सुरुवात करण्यात आली. यंदा 11 रोजी रात्री 9.30 वा. कवींद्र फळदेसाई दिग्दर्शित स्थानिक युवा कलाकारांचा कोकणी नाटय़प्रयोग सादर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी आज 10 व उद्या 11 रोजी सकाळी श्री मल्लिकार्जुन देवाची मूर्ती असलेल्या तरंगांचे गावात आगमन होणार आहे. 17 रोजी दुपारी श्री अश्वत्थ नारायण मंदिरात वार्षिक सार्वजनिक श्री सत्यनारायण पूजा, रात्री फळफळावळ पावणी झाल्यानंतर होळी दहनाने या उत्सवाची सांगता होणार आहे.