प्रतिनिधी/ बेळगाव
मोटारसायकलची धडक बसून दोन दिवसांपूर्वी अनगोळ नाक्यावर (हरिमंदिर रोड) अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनोळखीचा मृत्यू झाला आहे. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
वाहतूक पोलिसांनी सुमारे 30 ते 35 वषीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. 21 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता अनगोळहून हरिमंदिरकडे जाणाऱया रस्त्यावरील अनगोळ नाक्मयानजीक केए 25 ईएफ 5234 क्रमांकाच्या मोटारसायकलची धडक बसून 30 ते 35 वषीय युवक जखमी झाला होता. त्याचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात मोटारसायकल चालविणारा दीपक पिराजी अनगोळकर (रा. अनगोळ) व पाठीमागे बसलेला अनिल गणपतराव शिंदे (रा. चिदंबरनगर) हे दोघे जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अनोळखी युवकाचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आला आहे.
मृत युवकाच्या उजव्या हातावर श्रीरामाची मूर्ती गोंदण्यात आली आहे. 5.6 फूट उंची, अंगाने सुदृढ, काळसर वर्ण, गोल चेहरा असे त्याचे वर्णन आहे. वरील वर्णनाच्या युवकाविषयी कोणाला माहिती असल्यास वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.