अक्कलकोट : प्रतिनिधी
दुधनी ता.अक्कलकोट येथील म्हेत्रेनगर तांडा समोर मंगळवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलला समोरून टँक्टरने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील आई, वडिल व मुलगा अशा तीघांचा मृत्यु झाला. सर्व मयत कर्नाटकातील अर्जुनगी ता.अफझलपूर जि.कलबुरगी येथील असुन नागनहळ्ळी ता.अक्कलकोट येथे आज्जीच्या अंत्यविधी करिता आले होते. अत्यंविधी करून परत जाताना काळाने घाला घातला. धोंडीराम गोपू जाधव (वय ४६ वर्षे) पत्नी संगिता धोंडीराम जाधव (वय ३८ वर् व मुलगा अभिषेक घोंडीराम जाधव (वय २१ वर्षे) सर्व राहणार अर्जुनगी तांडा ता.अफझलपूर (कर्नाटक) असे अपघातातील मयतांची नांवे आहेत. याची दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी टँक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे . चालक अपघात झाल्यावर पळुन गेला. टँक्टर, मोटारसायकल जप्त करण्यात आले.
याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी, मंगळवारी रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे नातेवाईक नागनहळ्ळी ता. अक्कलकोट येथे आज्जी मयत झाल्याने अंत्यविधी करुन घरी परत अर्जुनगी ता. अफजलपुर जि. कलबुरगीकडे जात असताना फिर्यादी हे त्याच्या मोटारसायकल आईसह होते तर सोबत नातेवाईक धोंडीराम जाधव, पत्नी संगिता, व मुलगा अभिषेक असे त्यांची मोटारसायकल क्रमांक के ए ३२ इ पी ७२६६ वरुन जात असताना दुधनी म्हेत्रे नगर तांडा येथे आले असता समोरुन लाल रंगाचे ट्रॅक्टर इंजिन नं.एन एमएच२युसीइओ१०४ च्या अज्ञात चालकाने अविचाराने, हयगयीने, बेदरकारपणाने रस्त्याचे व वाहनाचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन वेगाने चालवुन धोंडीराम जाधव यांचे मोटारसायकलीस समोरुन जोरात धडक देवुन त्यात धोडीराम गोपु जाधव (वय ४६) वर्षे त्यांची पत्नी संगिता धोंडीराम जाधव (वय ३८ वर्षे)व मुलगा अभिषेक धोंडीराम जाधव (वय २१ वर्षे) सर्व राहणार अर्जुनगी तांडा यांना गंभीर जख्मी करुन त्यांना उपचारास दाखल न करता खबर न देता पळुन जावुन त्यांचे मृत्युस कारणीभुत झाला आहे व धोंडीराम गोपु जाधव यांच्या मोटारसायकलची नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद मानसिंग रेसिंग चव्हाण (वय-२७ वर्ष) रा-अर्जुनगी तांडा ता. अफजलपुर जि. कलबुरर्गी यांनी दिली. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक प्रदिप काळे, पोसई छबु बेरड यांनी भेट दिली. अधिक तपास पो.स.ई. छबु बेरड हे करीत आहेत.