बेळगाव, बागलकोटसह महाराष्ट्रात चोरीची कबुली, 15 मोटारसायकली जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र व कर्नाटकात मोटारसायकली चोरणाऱया एका आंतरराज्य गुन्हेगाराला अथणी पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली असून त्याच्या जवळून 5 लाख रुपये किमतीच्या 15 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
रमजान हुसेनसाब ऐनापूर (वय 27, मूळचा रा. शिरहट्टी, सध्या रा. यल्लम्मावाडी, नवग्राम प्लॉट, अथणी) असे त्याचे नाव आहे. अथणीचे मंडल पोलीस निरीक्षक शंकरगौडा बसनगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. डी. घोरी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. जी. आरेर, हवालदार ए. ए. इरकर, पी. बी. नाईक, एम. बी. दोडमनी, बी. जे. तळवार, एस. के. नेमगौडा आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
अथणी तालुक्मयात मोटारसायकल चोरीचे प्रकार वाढले होते. त्यामुळे या प्रकरणांच्या तपासासाठी अथणीचे पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने रमजानचा शोध घेवून गुरुवारी त्याला अटक केली. ही कारवाई करणाऱया पथकाला जिल्हा पोलीस प्रमुखांनी बक्षीस जाहीर केले आहे.
बेळगाव, बागलकोट जिल्हय़ात तसेच महाराष्ट्रातही मोटारसायकली चोरल्याची कबुली रमजानने दिली आहे. यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी अथणीचे पोलीस निरीक्षक शंकरगौडा बसनगौडर यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.