नवी दिल्ली
मोटोरोलाचा बहुप्रतिक्षीत फोन मोटो जी 60 आणि मोटो जी 40 हे बाजारात दाखल झाले आहेत. उत्तम कॅमेरा, शक्तीशाली प्रोसेसर आणि आकर्षक डिझाइन ही स्मार्टफोन्सची वैशिष्टय़े सांगितली जात आहेत. मोटो जी 40 फ्युजन 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजसहच्या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 999 रुपये इतकी असणार आहे. डायनॅमिक गे आणि फ्रॉस्टेड शँपेन या दोन रंगात फोन आला आहे. मोटो जी 60 6 जीबी व 128 जीबी स्टोरेजसह येणाऱया या स्मार्टफोनची किंमत 17 हजार 999 रुपये इतकी असणार आहे.