वृत्तसंस्था/ मुगेलो
शनिवारी येथे झालेल्या इटालियन ग्रां प्रि मोटो जीपी शर्यतीच्या पात्र फेरीच्या शर्यतीवेळी झालेल्या दुर्घटनेत स्वीसचा मोटो-3 चालक 19 वर्षीय जेसन डुपास्क्वायर ठार झाला.
पात्र फेरीच्या शर्यतीत डुपास्क्वायरच्या गाडीला दुसऱया एका गाडीने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत डुपास्क्वायरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. लागलीच त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली पण शेवटी त्याची प्रकृती अधिकच बिघडली. त्याच्या मेंदूलाही जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. इटालियन ग्रां प्रि मोटो जीपी स्पर्धेत डुपास्क्वायरला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याच्या संघानेही या शर्यतीतून माघार घेतली आहे.