- गेल्या 24 तासात 48,700 नवे रुग्ण; 524 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरी देखील रुग्ण संख्या आणि मृत्यूची संख्येत वाढ सुरु आहे. अशातच काल महाराष्ट्रातून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
मागील 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सोमवारी राज्यातील तब्बल 71,736 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर मागील 6 दिवसात 4 लाख 42 हजार 466 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर काल 48,700 रुग्णांची नव्याने नोंद झाली.
दरम्यान, कालच्या दिवशी 524 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 43 लाख 43 हजार 727 वर पोहचली आहे. यातील 36 लाख 01 हजार 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 65 हजार 284 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.92 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.5 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 74 हजार 770 रुग्ण उपचार घेत आहेत.
- मुंबई : एकूण रुग्ण संख्या 6,31,527
मुंबईतून देखील थोडी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील 24 तासात तब्बल 9,150 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 3,876 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर कालच्या दिवशी 70 जणांचा मृत्यू झाला. आता पर्यंत 5,46,861 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 70,373 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
- पुण्यातील 6,88,158 रुग्ण कोविडमुक्त!
पुणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 06 हजार 046 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 151 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवशी 8,823 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण बधितांची संख्या 7,99,232 वर पोहोचली आहे. तर 98 हजार 786 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 12,457 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.