- ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 6 लाखांच्या खाली
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत राज्यात तब्बल 61,607 जणांनी कोरोनावर मात केली. तर 37,236 नव्या रुग्णांची नोंद झाली.
दरम्यान, कालच्या दिवशी 549 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 51 लाख 38 हजार 973 वर पोहचली आहे. यातील 44 लाख 69 हजार 425 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 76 हजार 398 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.97 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.49 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 5 लाख 90 हजार 818 रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 96 लाख 31 हजार 127 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 51 लाख 38 हजार 973 (17. 34 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36 लाख 70 हजार 320 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर 26 हजार 664 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.