नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
भारतीय लष्कराच्या एका निवड आयोगाने रिकॉनेबल सर्व्हिसला २५ वूर्ष होण्यानिमित्ताने कर्नल पदावर पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला. पहिल्यांदाच इंजिनिअरिंग श्रेत्रातील पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदी प्रमोशन केले. कॉर्प्स ऑफ सिग्नल्स, कॉर्प्स ऑफल इलेक्ट्रोनिक्स अँड मॅकेनिकल इंजिनिअर्स आणि कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्समध्ये काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल रँकसाठी मंजूरी दिली आहे. भारतीय लष्कराच्या विविध शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीचे मार्ग वाढवून लष्करात त्यांच्यासाठी करिअरच्या संधी वाढण्यासाठी हा महत्वाचा निर्णय आहे.
कर्नल पदासाठी निवडलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांमध्ये सिग्नल कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, ईएमई कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल सोनी आनंद आणि लेफ्टनंट कर्नल नवनीत दुग्गल आणि कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समधून लेफ्टनंट कर्नल रीनु खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल रिचा सागर यांचा समावेश आहे.
यापूर्वी महिला अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीला फक्त आर्मी मेडिकल कॉप्स, जज अॅडवॉकेट जनरल आणि आर्मी एज्युकेशन कॉर्प्स यांना होती. पण आता इंजिनिअरिंग क्षेत्रातील महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदी पदोन्नती होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय लष्कराच्या अधिक शाखांमध्ये पदोन्नतीचे मार्ग विस्तारणे हे महिला अधिकाऱ्यांसाठी या क्षेत्रात वाढत्या करिअरच्या संधीचे संकेत आहेत.