ऑनलाईन टीम / मुंबई :
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तशी शिफारस केली होती. ही शिफारस राज्यपालांनी मान्य केली आहे.
‘जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला आवडेल,’ अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. दिलीप वळसे पाटील हे आजच दुपारी गृहमंत्रीदाचा चार्ज घेणार आहे. तत्पूर्वी दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, जबाबदारी मोठी आहे आणि ती पार पाडण्यास मला निश्चित आवडेल. मी दुपारी 1.30 वाजल्यानतंर मंत्रालयात येऊन पदभार स्वीकारणार आहे. शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली असून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे.
दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्याकडील कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, तर उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.