ऑनलाईन टीम
जगभारातली सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या ‘गुगल’मध्ये तांत्रिक अडचण निर्माण भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला होता. आज सायंकाळी 5 वाजलेनंतर काही काळ या सेवा बंद होत्या. त्यानंतर काही काळात या सेवा पूर्ववत सुरू झाल्या आहेत.
आज सायंकाळी गुगलच्या जवळपास सर्वच सेवा ठप्प झाल्या होत्या. जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात नेटिझन्सना अडचणी येत होत्या. दरम्यान, ‘गुगल’कडून यामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र, पुन्हा या सेवा सुरू झाल्याने नेटिझन्सना दिलासा मिळाला आहे.