प्रतिनिधी/ सातारा
रंग बरसे….होली हे
म्हणत संपुर्ण जिल्हय़ात मोठय़ा उत्साहात रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. तब्बल दोन वर्षानंतर हा उत्सव पुन्हा पुर्वी प्रमाणे साजरा करण्यास परवाणगी मिळाल्याने अबाल वृध्दांपासुन सर्वजण रंगोत्सवाच्या रंगात चांगलेच न्हाऊन निघाले होते. अनेक ग्रामीण भागांमध्ये तर पारंपारिक पध्दतीने हा सण साजरा करण्यात आला. यादिवशी सर्व सरकारी व काही खासगी कार्यालये सुरू असल्याने अनेकांनी आपल्या कर्मचाऱयांसमवेत हा रंगोत्सव साजरा केला.
शहरात सकाळच्या सुमारे अनेक ठिकाणी एकमेकांना रंग लावण्यात येत होता. त्यानंतर दुपारी काही प्रमाणात शांतता होती पण 4 नंतर पुन्हा रंगोत्सवाला सुरूवात झाली रात्री उशीरा पर्यंत अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येत होता. कोणतीही अनुचित घटणा घडु नये याकरिता पोलिस प्रशासनाचे ही सर्व घडामोडींकडे काटेकोर पणे लक्ष होते. तसेच हुल्लडबाजी करणाऱयांना चांगला दर ही पोलिसांकडुन देण्यात येत होता.
विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत
अनेक शाळा महाविद्यालये ही मंगळवारी सुरूच होती. त्यामुळे शहरातील अनेक शाळांमध्ये ही लहान मुलांकरीता रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तर कॉलेज सुटल्यावर कॉलेजच्या बाहेर एकमेकांच्या अंगावर रंगाची उधळण करत हा सण मोठय़ा जल्लोशात साजरा करण्यात आला.
कोरडय़ा रंगाचा अधिक वापर
यंदा रंगपंचमीच्या निमित्ताने कोरडय़ा रंगाचा सर्वाधिक प्रमाणात वापर करताना दिसत होते. हे कोरडे रंग त्वचेकरीता ही हाणीकारक नसल्याने अनेक मित्रमंडळींकडुन अगदी आनंदाने हे रंग लाऊन घेण्यात येत होते. कित्तेकांनी तर आपल्या बरोबरच कोरडय़ा रंगाची पिशवी सोबत बाळगली होती. परिचयापैकी कोणी दिसले त्यांना हा रंग लावण्यात ये होता.
जागतिक जल दिन आणि रंगपंचमी
अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच पहिल्यांदाच जागतिक जल दिन आणि रंगपंचमी हा सन एकत्रित आला होता. जल दिनाच्या निमित्ताने पाण्याच्या गैरवापर टावा, पाणी हे अमुल्य असुन याचा वापर काळजी पुर्वक करावा, अशा सुचना देण्यात येतात. पण यंदा मात्र या जलदिनादिवशीच पाण्याचा सर्वाधिक वायफळ वापर करण्यात आला होता. याचे प्रमुख कारण म्हणचे रंगपंचमी, अनेक ठिकाणी तर पाण्याचे कारंजेच लावण्यात आले होते.
रेन डान्स अन् बरच काही
या उत्सवानिमित्त शहरात अनेक मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खा. छ. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूनगर रंगोत्सव 2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील एसटी कॉलनी मैदानावर खास महिलांकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नैसर्गिक रंगाची उधळ करत डीजेच्या तालावर रेन डान्स ही आयोजित केला होता. अनेक महिलांनी यामध्ये उपस्थिती दर्शविली होती. याचबरोबर धून टाक या फेस्टिव्हलचे ही येथील कोटेश्वर मैदानावर आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फनी गेम्स, स्नो कलर्स, सेल्फी पॉईंट, स्पेशल डान्स सेक्शन आदिंसह अभिनेत्री शिवानी सुर्वे या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षण होत्या.