अमित साधसोबत चित्रपटात करतेय काम
अनिल शर्मा यांचे सहाय्यक दिग्दर्शक राहिलेले सचिन सराफ आता स्वतःचा पहिला चित्रपट तयार करणार आहेत. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे ईशा देओल. विवाहानंतर दीर्घकाळ अभिनयापासून दूर राहिलेल्या ईशाने यापूर्वी डिस्ने प्लस हॉटस्टारची वेबसीरिज ‘रुद्र’मध्ये काम केले होते. ओटीटीनंतर ईशा आता चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटातील माझी भूमिका जीवनात महिलांचा विकास दर्शविणारी आहे. एक महिला सर्वकाही साध्य करू शकते हा संदेश देणारी ही भूमिका असल्याचे ईशाने म्हटले आहे. दिग्दर्शक सचिन सराफ यांच्या या चित्रपटात ईशाचा नायक म्हणून अमित साध झळकणार आहे. अमित साधने अनेक यशस्वी वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
अमित हा हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या नव्या पिढीचा एक उत्तम अभिनेता आहे. अजय देवगणसोबतची सीरिज ‘रुद्र’मध्ये यापूर्वी मी काम केले होते. सुनील शेट्टी यांच्यासोबत एका प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. या दोन्ही अभिनेत्यांसोबत काम करताना दबाव जाणवला नाही. अमित साधसोबत काम करण्याचा एक नवा अनुभव असणार आहे. प्रत्येक अनुभव आम्हाला जीवनात एक उत्तम व्यक्ती होण्यास मदत करत असल्याचे माझे मानणे असल्याचे ईशाने म्हटले आहे.
सचिन सराफ दिग्दर्शित या चित्रपटात ईशा देओल, अमित साध यांच्यासह तिग्मांशू धूलिया, सीमा बिस्वास, मिलिंग गुणाजी यांची मुख्य भूमिका आहे. अमित साध या चित्रपटात एन्काउंटर स्पेशलिस्टची भूमिका साकारतोय. प्रदीप रंगवानी या चित्रपटाचे निर्माते आहेत.