प्रतिनिधी/ सातारा
ऐतिहासिक अशा मोती तळय़ाची स्वच्छता सातारा पालिकेच्यावतीने करण्यात येते. या तळयात अस्वच्छता झालेली आहे. या तळय़ाची स्वच्छता करण्यासाठी सातारा पालिकेच्यावतीने 2 लाख 84 हजार 745 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सातारा पालिकेच्यावतीने लवकरच या तळयाच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या तळय़ाच्या स्वच्छतेबरोबर जे येता-जाता या तळय़ात कचरा टाकतात त्यांच्यावर पालिकेने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होवू लागली आहे.
सातारा पालिकेच्यावतीने दर दोन ते तीन वर्षांनी मोती तळय़ाची स्वच्छता करण्यात येते. या तळयात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येत असल्याने तसेच तळय़ातील पाण्याचा विसर्ग होत नसल्याने तळय़ातील पाणी अस्वच्छ आहे. तसेच येता जाता काही नागरिक आर्वजून कचऱयाची पिशवी या तळयात टाकत असतात. तळय़ाला जाळय़ा लावल्या तरीही जाळीच्या वरुन कचऱयाची पिशवी तळयात टाकली जाते. त्यमुळे तळय़ात अस्वच्छता निर्माण झाली आहे. या तळय़ाची स्वच्छता करण्यासाठी सातारा पालिकेच्यावतीने सुमारे पावणे तीन लाखाची तरतूद करण्यात आली असून लवकरच तळय़ाची स्वच्छता करण्यात येईल असे पालिकेतून सांगण्यात आले.