ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा सतत विरोध करताना दिसत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस कोलकाता दौऱयावर आहेत.
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर 13 जानेवारीला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीच्या आदल्या दिवशी म्हणजेच उद्या ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर दिसणार आहेत. कोलकाता पोर्ट ट्रस्टला 150 वर्षे पूर्ण झाल्यामुळे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांच्यासह नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, ठरलेल्या वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी 4 वाजता पंतप्रधन नरेंद्र मोदी कोलकात्यात दाखल झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासोबत बैठक होणार आहे. नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांची राजभवनामध्ये बैठक होणार असल्याचे एका वरि÷ अधिकाऱयांने सांगितले.