ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 7 जुलैला होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये 17 ते 22 नवे चेहरे शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मोदी सरकार बळकट करण्यासाठी ज्या राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूका आहेत. त्या राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. केंद्रीय मंत्रिमंडळात 81 सदस्य असू शकतात. सध्या 53 मंत्री आहे. महाराष्ट्रातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर, हिना गावित, नारायण राणे यापैकी एक ते दोन नेते मोदी मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात. तर पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, स्मृती ईरानी, रविशंकर प्रसाद, हरदीप सिंह पुरी, डॉ हर्षवर्धन आणि नरेंद्र सिंह तोमर हे अतिरिक्त प्रभार सोडू शकतात.