प्रतिनिधी / सोलापूर
वर्षाला दोन कोटी रोजगार व अनेक खोटी आश्वासने देऊन मोदी सरकार सत्तेवर आले. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे, नोटबंदी, जीएसटीची अपयशी आणि चुकीची अंमलबजावणी, सरकारी कंपन्या आपल्या बगलबच्चा उद्योगपतींना विकण्याच्या धोरणामुळे सात वर्षांत कोट्यावधी युवक बेरोजगार झाले आहेत. लाखो छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत. यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत, असे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले.
बेरोजगार दिनानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात हल्लाबोल आंदोलन, बेरोजगारीचे प्रदर्शन करत बेरोजगार अभियंत्यांनी गोट्या खेळून मोदी सरकारचा निषेध केला. त्यावेळी डॉ. मोहिते बोलत होते. याप्रसंगी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, माजी आमदार रामहरी रुपनर उपस्थित होते. हल्लाबोल आंदोलनानंतर बेरोजगार युवकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात गोटÎा खेळून मोदी सरकारचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला.
डॉ. मोहिते म्हणाले, लाखो छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत. यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. कर्जे काढून मुलांना चांगले शिक्षण आईबाप देतात. या सुशिक्षित युवकांना मोदी सरकारचे मंत्री निर्लज्जपणे पकोडे विका म्हणून सल्ला देतात. कोटÎवधी युवकांना बेरोजगार करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्यासाठी, बेरोजगार युवकांचा आवाज मोदी सरकारपर्यंत पोचविण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला.
यावेळी अध्यक्ष अंबादास करगुळे यांनीही मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात अभियंता सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, सुशिक्षित अभियंते आकाश कांबळे, सागर शिंदे, विक्रम गाडीकर, रितेश कोकणे, अलीम अन्सारी सहभागी झाले. यावेळी कार्याध्यक्ष युवराज जाधव, उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष विवेक कन्ना, मध्य विधानसभा युवक अध्यक्ष योगश मार्गम, राहुल वर्धा, प्रवीण जाधव, तिरुपती परकीपंडला, सुशील बंदपट्टे, अभिराज शिंदे, संजय गायकवाड, गोविंद कांबळे, निलेश व्हटकर, रवी शिंदे, किरण राठोड, सुभाष वाघमारे, जावेद कुरेशी, राजेंद्र शिरकुल, गणेश वाघमारे, मनोहर माचर्ला, गणेश इंगळे, शिवराज कोरे, विकास कांबळे, शशी शेळके, इरफान शेख, सागर व्होटकर, रोहित पाटील, यांच्यासह इतर बेरोजगार युवक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.