ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत असलेल्या किंमती यावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी आज ट्विट करत म्हणाले की, मोदी सरकारने कोरोना महामारी, पेट्रोल आणि डिझेलचे दर अनलॉक केले आहेत. पुढे ते म्हणाले, केंद्र सरकारने अनलॉक जाहीर केल्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येबरोबरच इंधनाचेही दर वाढत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसत आहेत. तसेच कोरोनामुळे देशातील आरोग्यावर व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे.
खरं तर सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊन लागू केला होता. लॉक डाऊन असेपर्यंत रुग्णवाढीचा वेग नियंत्रणात होता. मात्र, केंद्र सरकारनं अनलॉक जाहीर केल्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
आपल्या ट्विट मध्ये राहुल गांधी एक आलेख देखील शेअर करत मोदी सरकारने कोरोना महामारी व पेट्रोल-डिझेलच्या किंमती अनलॉक केल्या आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.