प्रतिनिधी /पेडणे
गेल्या दोन वर्षांत कोरोना निर्बंधांमुळे उत्सवांवर मर्यादा आली होती. मात्र यंदा चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढी पाडव्याला साजरा होणाऱया मोपा गावातील श्री देव गिरोबा देवाच्या वार्षिक उत्सवाला उत्साहात साजरा झाला भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावत देवदर्शनाचा लाभ घेतला .
यावषी या उत्सवाची आस सर्वाना लागलेली होती. वास्तविक 3 ते 5.30 यावेळेत मुलींना कौल देण्याचा कार्यक्रम असतो. परंतु, या वषी भाविकांनी दुपारी एक वाजल्यापासूनच गर्दी झाल्याने कार्यक्रम दुपारीच सुरू करावा लागला. हा कार्यक्रम सायंकाळी उशिरा पर्यंत चालू होता.
सकाळी धार्मिक पूजा विधी झाल्यानंतर तोरसेचे दिगंबर च्यारी कुटुंबीयांकडुन श्री देव गिरोबा देवाची सुबक सुंदर मूर्ती तयार करण्यात आली. नंतर गावच्या महाजनांकडून दिगंबर फाटक यांच्या पौरहित्याखाली पूजा झाली. दुपारी देवाला नैवेद्य अर्पण करून विवाहित मुलींन अवसारी कौल देण्याला सुरवात झाली. फळफळावळीची पावणी झाली. नंतर सामूहिक गाऱहाणे घालुन देव दर्शनास सुरवात झाली.
दरम्यान, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी देवाच्या दर्शनासाठी खास उस्थितीती लावली होती. यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, उगवे- तांबोसे- मोप सरपंच्या सरस्वती नाईक, उपसरपंच सुबोध महाले, माजी सरपंच प्रमोद परब, जयप्रकाश परब, आत्माराम परब, सत्यवान नाईक, माजी पंच अशोक परब, दत्ताराम परब, संजू परब, अरुण नाईक आदी उपस्थित होत. रात्री ‘धनुर्बंध’ हे नाटक सादर करण्यात आली.