घातपाताचा संशय व्यक्त : पेडणेसह म्हापसा अग्निशामक दलाचा पाचारण
प्रतिनिधी /पेडणे
मोपा विमानतळावरील उभ्या असलेल्या पाच ट्रकांना आग लागण्याची घटना काल बुधवारी दुपारी घडली. पेडणे आग्निशामक दल आणि म्हापसा अनिशामक दलाला ही आग विझविण्यासाठी प्रचारण करण्यात आले. तोपर्यंत आगीत पाचही ट्रक जळून खाक झाले. याबाबत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पेडणे अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव परवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 12.50 वा. पेडणे अग्निशामक दलाला मोपा विमानतळ येथे ट्रकांना आग लागल्याची दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली. याची माहिती मिळताच पेडणे अग्निशामक दलाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखले झाले.
पेडणे, म्हापसाहून मागविले बंब
आग मोठय़ा प्रमाणात लागल्याने अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव परवार यांनी म्हापसा येथून बंब मागवले. पेडणे अग्निशामक दल व म्हापसाहून आलेले अग्निशामक दल यांच्या सहकार्याने ट्रकांना लागलेली आग विझविण्यात आली.
ट्रक क्रमांक जीए-03- एएच-3056, जीए 03,-एएच-3057, जीए-04-टी-2392, जीए-04-टी-1763, जीए-01-झेड-4300 हे आगीत जळाले.
घटनेत अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव परवार, साहाय्यक अधिकारी सुनील देसाई, हवालदार फटू नाईक, हवालदार प्रमोद महाले, चालक एप्रिइमो डायस, चालक विठ्ठल परब, जवान रतन परब, धनंजय वस्त, आल्वारीस मास्करेन्हस, विष्णू नाईक, आणि वासुदेव ताटे यांनी ही आग विझविली.
आग लावली की लागली?
विमानतळ परिसरातीत सुक्या गवताला आग लागून ती पसरल्याने ट्रकांना आग लागल्याची शक्मयता वर्तविण्यात आली असली तरीही आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अलिकडेच मोपा विमानतळावरील कामगारांना पगार वेळेवर मिळत नसल्याचे कारण पुढे करत कर्मचाऱयांनी एका गाडीच्या काचा फोडल्या होत्या. तसेच एका कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला होता, आणि आता ही आगीची घटना घडल्याने या दृष्टीने तपास होण्याची शक्यता आहे.