पेडणे / प्रतिनिधी
मोपा विमानतळ पीडित शेतकरी संघटना मोपा संघर्ष समिती व तालुक्मयातील सामाजिक क्षेत्रातील युवकांनी सुरू केलेल्या चळवळीतील महत्वपूर्ण बैठक गुरुवार दि. 18 रोजी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 3.30 वाजता आयोजित केली आहे.
या बैठकीत मोपा विमानतळ प्राधिकरण ,जीएमआर कंपनी ,जमीन संपादित कार्यालय यांच्या अधिकाऱयांबरोबर एकत्र बैठक घेण्याची मागणी केली जाणार आहे .सदर मागणीचे एक निवेदन पेडणे आमदार यांना देण्यात आले आहे .
14 जानेवारी पासून पुन्हा एकदा मोपा विमानतळामूळे शेतकरी वर्ग ,जमीनधारक यांच्यासमस्यांना वाचा फोडून चळवळ उभी राहिली आहे ,या दिवशी 22 कलमी निवेदन उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले व एक दिवसीय धरणे कार्यक्रम आयोजित केला होता ,उपजिल्हाधिकारी रविशेखर निपणीकर यांनी संघटना चर्चेस आमंत्रण दिले आता पर्यंत उपजिल्हाधिकारी व संघटना यांच्यामध्ये चार बैठका झाल्या आहेत .
18 रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे व त्यामध्ये संबंधित अधिकाऱयांना पेडणे येथे बोलवा व त्यांनी आतापर्यंत लोकांसाठी काय योजना केली आहे व वेगवेगळय़ा समस्यांवर काय तोडगा काढला यावर माहिती घेतली जाईल .दिनांक 17 रोजी बैठकीत एक निवेदन सादर करून उपरोलिखित मागणी केली आहे.
18 रोजी होणाऱया बैठकीत काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी बैठकीस हजर राहावे असे आवाहसन संघटना प्रमुख नारायण गडेकर यांनी केली आहे .