प्रतिनिधी /पेडणे
माहेरवाशिणींचा देव म्हणून ख्याती असलेल्या तालुक्मयातील मोपा येथील श्री गिरोबा देवाचा वार्षिक उत्सव शनिवार दिनांक 2 एपिल 2022 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त दिवसभर धार्मिक, सांस्कृतिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्षपध्दतीपमाणे सकाळी गावठणवाडा येथील चव्हाटय़ावर होळीची पूजा झाल्यानंतर श्री गिरोबा देवाची सुबक मूर्ती तयार करण्यात येईल. त्यानंतर दुपारी देवाच्या नूतन मूर्तीची पूजा, आरती, देवांचा कौल, सामूहिक गाऱहाणे दर्शन सोहळा व पावणीचा कार्यकम होईल.
या उत्सवानिमित्त रात्री 10 वाजता श्री देव गिरोबा रंगमंचावर नारायण बामणगावकर लिखित दोन अंकी संगीत पौराणिक धनुर्भंग नाटकाचा पयोग सादर होणार आहे. तरूण हौशी नाटय़मंडळ मोपाने या नाटकाची निर्मिती केली असून दिग्दर्शन सिध्देश परब यांचे आहे. संगीत दिग्दर्शन दिगंबर गाड, तबला साथ अजित बागवे, पार्श्वसंगीत – सत्यवान नाईक व ध्वनीसंकलन साई साऊंड सर्व्हिस बांदा तर रंगभूषा, वेषभूषा, नेपथ्य, प्रकाश योजना पार्से येथील सोपटे नाटय़भांडार यांची आहे.
यात नाटकातील कलाकार पुढील पमाणेः संदेश शेटय़?, शांताराम पालव, प्रसाद परब, प्रकाश नाईक, गिरीश परब, श्रेयश सावंत, राजेंद्र नाईक, रूपेश सावंत, संकेत परब, संदेश नाईक, अभि सावंत, शुभम परब, प्रथम परब, स्वानंद नाईक, आयुष नाईक, दीप परब, चंदन नाईक, तुकाराम नाईक आणि सौ. कांचन चिपळूणकर, सौ. लक्ष्मी महात्म?.
या उत्सवाला मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यकमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मोपा ग्रामस्थ मंडळींतर्फे करण्यात आले आहे.