प्रतिनिधी / पेडणे
धारगळ सुकेकुळ ते मोपा लिंक या राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन विभागातर्फे सरकारने सर्व्हक्षण करण्याचे काम सुरु केले आहे. या रस्त्याच्या कामाला मोठय़ा प्रमाणात शेतकऱयांच्या जमिनी जात असून शेतकऱयांचा विरोध होणार हे गृहित धारुन शेतकऱयांचा विरोध धुडकावून सोमवारी मोठय़ा प्रमाणात गोव्याच्या विविध भागातून 8 पोलीस बस गाडय़ा आणून पोलीस संरक्षणात सर्व्ह? काम करण्यात आले.
मोपा विमानतळ प्रकल्पावर जाण्यासाठी सुकेकुळण धारगळ ते मोपा येथे राष्ट्रीय महामार्ग होणार असून या रस्त्यासाठी मोठय़ा प्रमाणात शेतकऱयांच्या जमिनी जात असून या रस्त्याची रुंदी 80 मीटर आहे. या रस्त्यासाठी शेतकऱयांचा तीव्र विरोध असून शुक्रवारी भूसंपादन विभागाचे अधिकारी रस्त्याच्या जमिनीची सर्व्ह? करण्यासाठी आले असता यावेळी शेतकऱयांनी विरोध केला. आंदोलन करणाऱया या शेतकऱयांना मोठय़ा प्रमाणात पोलीस आणून ते बसगाडय़ातून म्हापसा व हणजूणा पोलीस स्थानकात नेण्यात आले होते. मंगळवारी सकाळी रस्त्याच्या जमिनीचे सर्व्हेक्षण होणार यासाठी गोवा पोलिसांच्या 12 बसगाडय़ा आणण्यात आल्या .