प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या फैलावामुळे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. मात्र यामुळे अनेक वयोवृद्ध तसेच रूग्ण मंडळींची गोळय़ा औषधाविना परवड होत आहे. त्यातही गोर गरीब कुटुंबातील रूग्णांची परिस्थिती बिकट बनत चालली आहे. अशा कुटुंबातील रूग्णांसाठी मोफत औषधे वाटप करण्याचे काम सुरू आहे. ‘मोफत औषध वितरण अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांचे राजकीय कार्यदर्शी शंकरगौडा पाटील आणि कार्यकर्त्यांच्या वतीने बेळगाव जिल्हय़ातही मोफत गोळय़ा -औषधे (जनेरीक) देण्यात येत आहेत. यामुळे अनेक गरीब कुटुंबातील रूग्णांची सोय झाली आहे.
लॉकडाऊन परिस्थितीमुळे औषधे घेणे कठिण बनले आहे. तर औषधांची दुकाने सुरू असली तरी तेथून औषधे घेण्यासारखी परिस्थितीही बऱयाच जणांची नाही. याची दखल घेऊन राज्य भाजप युवा मोर्चाचे मुख्य सचिव विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात ‘मोफत औषध वितरण अभियान’ सुरू करण्यात आले आहे. बेळगाव जिल्हय़ातही हे कार्य सुरू आहे. संबंधीतांनी याचा सदुपयोग करून घ्यावा. असे कळविण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हय़ातील रूग्ण मंडळींनी इरण्णा अंगडी यांच्याशी 94827 56999, निलकंठ (गुंडू) मास्तमर्डी – 94490 89912, दीपक पाटील – 96326 11008, सुनिल मुद्दीमने – 94491 87711 यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 78998 54857 किंवा 91135 44199 या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.