प्रतिनिधी / बेळगाव
येथील के.एल.ई. आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि एमआरसी शहापूर यांच्यातर्फे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. किडनीचे विकार आणि आजार तपासणी शिबिरात गुरुवार दि. 24 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत तपासणी पार पडणार आहे. याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.