सरकारचा निर्णय स्तुत्य की फसवा असल्याचा प्रश्न : सोळा हजारहून अधिक पाणी वापरणाऱयांना मोठा भुर्दंड
प्रतिनिधी /पणजी
पाण्याची बिले सर्वसामान्य ग्राहकांसाठी माफ करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले असले तरी, 16 हजार लिटरपेक्षा किंचतही जास्त पाणी वापरल्यास ग्राहकांना एवढा भुर्दंड पडणार की, त्यातून त्यांना रु. 9 युनिट या दराने पैसे भरावे लागतील. यामुळे सदर योजना उपयुक्त की फसवी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बुधवार 1 सप्टेंबरपासून जनतेला सरकारने 16 हजार लिटर पाणी मोफत देण्याचे जाहीर केले खरे, त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम खात्याने पाण्याच्या दरातही बरीच वाढ केली आणि ग्राहकांना त्याचा भुर्दंड सोसावा लागेल.
… सर्व बिल रु. 9 प्रति युनिट प्रमाणे
राज्य सरकारने 16 हजार लिटर पाणी दरमहा मोफत जाहीर केले खरे, परंतु ज्यांचे युनिट 16 हजार लिटर्सपेक्षा जास्त झाले तर त्या ग्राहकाला 16 हजार लिटर्सचे पैसे भरावे लागतील आणि ते देखील प्रत्येकी रु. 9 प्रति युनिट याप्रमाणे. यामुळे मोफत मिळणारे पाणी घेण्यापेक्षा अगोदरचे दर परवडेल, असा प्रकार होण्याची शक्यता आहे. लहान कुटुंबांना या योजनेचा लाभ हाईल. मोठय़ा कुटुंबांना मात्र फटका बसणार आहे. मोफत पाणी योजना राबविताना सरकारने पाण्याच्या दारात भरमसाठ वाढ केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने जारी केलेल्या पत्रकानुसार पाणी दरात जवळपास 50 टक्के वाढ केली आहे.
पाण्याचे जुने दरपत्रक
- जुने दर घरगुती ग्राहकांसाठी
- 0-15 घनमीटर रु. 2.50 प्रति युनिट
- 15-25 घनमीटर रु. 5.00 प्रति युनिट
- 25-50 घनमीटर रु. 10.00 प्रति युनिट
- 50 व अधिक रु. 15.00 प्रति युनिट
व्यावसायिक दरपत्रक
- 1) 0 ते 80 घनमीटर प्रति युनिट रु. 20
- 2) 80 पेक्षा जास्त प्रति युनिट रु 25
- किमान शुल्क रु. 200
- मध्यम रेस्टॉरंट व हॉटेल्स – रु. 30 प्रति घनमीटर
- इतर व्यावसायिक – रु. 35 प्रति घनमीटर
असे आहेत नवे घरगुती वापराचे दर
- 1) 0-16 प्रति घनमीटर शुल्क नाही.
- 2) 16-25 प्रति घनमीटर रु. 9 प्रति युनिट
- 3) 25-40 प्रति घनमीटर रु. 15 प्रति युनिट
- 4) 40-50 प्रति घनमीटर रु. 15 प्रति युनिट
- 5) 50 पेक्षा घनमीटर रु. 25 प्रति युनिट (सरसकट)
व्यावसायिक
- छोटी हॉटेल्स – 80 युनिटसाठी प्रति युनिट रु. 25
- 15 पेक्षा कमी खोल्यांचे हॉटेल 80 घनमीटर पर्यंत प्रति युनिट रु. 30
चाळीसाठी सवलत
दरम्यान एखाद्या चाळीत वा इमारतीत 40 फ्लॅट्स असतील त्या सर्वांसाठी एकच कनेक्शन असेल. अशावेळी प्रति युनिट 25 रु. याप्रमाणे 1250 घन मीटर पाण्याकरीता एकूण बिल 31250 रु. एवढे होतात. अशावेळी तिथे सवलत म्हणून 0 ते 15 घनमीटरसाठी प्रति युनिट रु. 3.5 ƒ 15 = 52.5. रु. आणि 16 ते 25 घनमीटरसाठी प्रति युनिट रु. 9 ƒ 10 = 90 रु. तर 90 + 52.5 म्हणजे रु. 142.50 प्रति युनिट. फ्लॅट – रु. 142.45 पैसे याचाच अर्थ 50 ही फ्लॅट्सना 7125 बिल आकारले जाईल.
सर्व ग्राहकांना मोफत पाणी मीटर्स देण्याचा निर्णयही सा. बां. खात्याने घेतलेला आहे. जे ग्राहक स्वतः मीटर्स बसवू पाहतात, त्यांना सा. बां. खात्यात दाखवून ते बसविण्यास असल्याचे दर्शवून नंतर बसविले तर त्यांना भाडे आकारले जाणार नाही.
छोटय़ा हॉटेल्सना सूट
दरम्यान, ज्या छोटय़ा हॉटेल्सना 15 रुम्स पेक्षाही कमी आहेत त्यांना पाणी दरात 50 टक्के सूट दिली जाणार आहे. अर्थात ज्यांचे बिल दरमहा रु. 500 येत होते, त्यांना त्या 250 रुपयांची सूट दिली जाईल.