देशात डिजिटल पेमेंटकडे वाढता कल : एस ऍण्ड पी अहवालातील माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सन 2019 मध्ये देशातील मोबाईल ऍपवर आधारित पेमेंट 163 टक्क्यांनी वधारुन 287 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचले आहे. ऍपचा वापर करुन करण्यात येणाऱया मोबाईलवरील पैशाच्या व्यवहारात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती एस ऍण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजेंसने आपल्या अहवालात दिली आहे.
यामध्ये डेबिट आणि पेडिट कार्डच्या आधारे पाँईट ऑफ सेल (पीओएस) देवाण घेवाण 24 टक्क्मयांनी वाढून 204 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. यामध्ये ऑनलाईन आणि ऍपवरुन करण्यात आलेल्या पेमेंटचा समावेश करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीमधून पेमेंट ऍपच्या आधारे आता सर्वाधिक वेगाने आर्थिक देवाण घेवाण करण्याकडे कल आहे. यामध्ये प्रामुख्याने मोबाईल फोन रिचार्ज, बिल पेमेंट व अन्य मोबाईलचा वापर करुन पेमेंट करण्यात वाढ झाली आहे. यात प्रत्येक एटीएमचा वापर केल्यानंतर भारतीयांनी कार्ड किंवा मोबाईल फोनच्या आधारेही देवाण घेवाण केली आहे. मागील वर्षापासून डिजिटल पेमेंटमध्ये तेजी आली आहे आणि ही पुढेही अशीच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
डिजिटल पेमेंटला 2019 पासूनच प्रारंभ
देशातील डिजिटल पेमेंटने 2019 पासूनच तेजी धरली आहे. यामध्ये 31 डिसेंबर 2019 मध्ये समाप्त तिमाहीत कार्ड आणि मोबाईल पेमेंट सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) च्या बरोबरीत 20 टक्क्मयांवर असल्याचे सांगितले आहे.