तुमच्या स्मार्टफोनला छानसं कव्हरही हवं. बाजारात वैविध्यपूर्ण आणि ट्रेंडी कव्हर्स मिळतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तसंच आवडीनुसार मोबाईल कव्हर निवडू शकता. मोबाईल कव्हरची निवड कशी करायची हे जाणून घेऊ.
- प्लॅस्टिक कव्हर बराच काळ टिकतं. तसंच हे कव्हर फार महागही नसतं. तुम्हाला कमी किंमतीत चांगलं कव्हर मिळू शकतं. वेगवेगळ्या रंगांची आणि स्टाईलची प्लॅस्टिक कव्हर्स बाजारात मिळतात.
- रबर कव्हरची ग्रीप चांगली असली तरी कालांतराने अशी कव्हर्स सैल होऊ लागतात. रबरचं कव्हरही कमी किंमतीत मिळू शकतं.
- फोन सुरक्षित ठेवायचा असेल तर फ्लिप मोबाईल कव्हर घ्या. अशी कव्हर्स लेदरपासून तयार केली जातात. अशी कव्हर्स जाड असल्यामुळे पडल्यानंतरही मोबाईलला धोका पोहचत नाही.
- खेळाडू किंवा सतत व्यस्त असणार्यांसाठी आर्म बँड मोबाईल कव्हर्स तयार करण्यात आली आहेत. ही कव्हर्स दंडावर बांधता येतात. ही कव्हर्स वजनाने हलकी आणि दणकट असतात. * मोबाईलला कव्हर घालायचं नसेल तर तुम्ही मोबाईल पाऊच घेऊ शकता. वेगवेगळ्या डिझाईन्सची आकर्षक पाउचेस उपलब्ध आहेत. त्यातून छानशा पाउचची निवड करता येईऊल.