प्रतिनिधी /बेळगाव
मोबाईल व लॅपटॉप चोरीच्या आरोपावरून एपीएमसी पोलिसांनी विजापूर येथील एका वृद्धाला अटक केली आहे. त्याच्याजवळून आठ मोबाईल व एक लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
मोहम्मदगौस दावलसाब शेख (वय 59) असे त्याचे नाव आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या सहकाऱयांनी मोहम्मदगौसला अटक केली आहे. कॅम्प पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात त्याने चोरी केल्याची कबुली दिली असून किमती मोबाईल चोरून जुजबी रकमेला त्याची तो विक्री करीत होता.
मोहम्मदगौस हा मूळचा विजापूरचा असला तरी वेगवेगळय़ा गावात तो फिरत असतो. हॉटेल किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचा मोबाईल चोरण्यात त्याचा हातखंडा आहे. बेळगाव परिसरातही त्याने चोऱया केल्याचे उघडकीस आले असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.