ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे देशभरात 20 एप्रिलपासून मोबाईल, टीव्ही, फ्रिज, लॅपटॉप आणि इतर स्टेशनरी साहित्याच्या विक्रीला गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातही या वस्तू ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सध्या जीवनावश्यक वस्तूंचीच विक्री होत आहे. बुधवारी लॉकडाऊन काळात अत्यावश्यक उपक्रम टप्प्याटप्प्याने सुरू करण्याविषयीची मार्गदर्शक सूचना बुधवारी केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी जारी केल्या होत्या. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले.
ग्राहकांनी ई-कॉमर्स कंपन्यांकडून कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूची मागणी केली तरी देखील कंपन्यांच्या पुरवठा व्हॅनला स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे.