प्रतिनिधी /पेडणे
बेकायदा दारू साठा केल्याप्रकरणी मोरजी येथील एका रेस्टॉरंट वजा सुपर मार्केट मार्केटवर छापा मारून साडेपाच लाख रुपयांची बेकायदा दारू जप्त केली. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी शुक्रवारी 14 रोजी रात्री ही कारवाई करत संबंधित मालकावर गुन्हा नोंद केला.
पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधित सुपर मार्केटच्या एका गोडावून मध्ये 4 लाख 53 हजार 30 रुपये व दुसरीकडे पन्नास हजार 780 रुपयांची दारू मिळून पाच लाख 3810 ची दारू जप्त केली. जप्त केलेली दारू अबकारी विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.
पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी पेडणे पोलीस स्टेशनचा ताबा घेतल्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. ताबा घेताच सुरुवातीला शापोरा आणि तेरेखोल नदीतील बेकायदा रेती उपसा बंद केला त्यानंतर लगेच कारवाई करून बेकायदा दारूचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, उपनिरीक्षक बाबुराव देसाई, पोलीस कॉस्टेबल संदेश वरक, विनोद पेडणेकर, सागर खोर्जुवेकर, स्वप्नील शिरोडकर, गरुदास मांदेकर, यांच्या पथकाने ही कारवाई केली.