साताऱयातील प्रकार : शाहूपुरी पोलीस ठाण्यात क्रार
प्रतिनिधी/ सातारा
धुणीभांडय़ाची कामे करणाऱया एका महिलेने घरातून 97 हजार 100 रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मंगल रामचंद्र बावधने (रा. जानकर कॉलनी, दरे बुद्रूक, ता. सातारा) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अमिना समीर मुजावर (वय 35 रा. शांतीनिकेतन, मंगळवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. मंगल बावधने ही महिला धुणीभांडय़ाच्या कामाला त्यांच्याकडे असून तिने 9 ते 12 डिसेंबर या कालावधीत घरातील कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 92 हजार रुपये किंमतीचे तीन तोळे वजनाची सोन्याची चेन, 2 हजार 500 रुपये किंमतीची चांदीची साखळी, 600 रुपये किंमतीच्या जोडव्या, 2 हजारांचे घडय़ाळ अशी एकूण 97 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरल्याचे मुजावर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी मंगल बावधने हिच्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला असून या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस नाईक जाधव करत आहेत.