प्रतिनिधी /धारबांदोडा
मोले येथील प्रसाद व्हाईन शॉप या घाऊक मद्य विक्रीच्या दुकानाला मंगळवारी आग लागली. त्यात दुकानातील मद्यसाठय़ासह इतर वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत दुकानमालकाची अंदाजे रु. 7 लाखांची नुकसानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जाते. फोंडा येथील अग्नीशामक दलाच्या पथकाकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.