ऑनलाईन टीम / पुलवामा :
जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात दक्षिणेकडील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू याला ठार केले आहे.
दहशतवाद्यांबरोबरची चकमक रात्री उशिरा पासून सुरू होती. सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण भागाला चारी बाजूंनी वेढले होते. रियाज नायकू येथे लपला असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. अखेर जवानांनी त्याला ठार केले.
रियाज नायकू हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. 2012 मध्ये तो हिजबमध्ये सामील झाला. यासीन ईट्टटूच्या मृत्यूनंतर जबाबदारी सांभाळत अवघ्या पाच वर्षात त्या संघटनेचा प्रमुख झाला होता.
2016 पासून नायकू सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. त्याच्यासाठी बारा लाख रुपयांचे बक्षीस होते. याद्या अनेक वेळा सुरक्षा यंत्रणेने घेरले होते मात्र तो पळून जाण्यात यशस्वी होत असे. अखेर आज त्याला ठार करण्यात सफलता मिळाली आहे.