आमदार सतीश जारकीहोळी यांचे प्रयत्न
प्रतिनिधी / बेळगाव
मोहनगा येथील भावकेश्वरी यात्रा कोरोनामुळे होणार की नाही? याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, मंगळवारी आमदार सतीश जारकीहोळी यांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन सदर यात्रेचे भक्त मोठय़ा संख्येने आहेत. कोरोना कमी झाला आहे, त्यामुळे ही यात्रा करण्यास परवानी द्या, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार जिल्हाधिकाऱयांनी या यात्रेला परवानगी दिली असून दि. 27 फेब्रुवारीपासून 1 मार्चपर्यंत ही यात्रा होणार आहे.
तातडीने तहसीलदारांनाही याबाबत आदेश द्यावा, असेही जिल्हाधिकाऱयांना सांगण्यात आले. यावेळी शिवाजी सुंठकर, अमोल दळवी, दड्डी विभाग सल्लागार दयानंद पाटील, अण्णा कोकीतकर, निंगाप्पा जाधव, मुकुंद घाडी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आता यात्रेचा संभ्रम दूर झाला असून 27 पासून या यात्रेला सुरुवात होणार आहे.