वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकात्यातील बलाढय़ मोहन बगान फुटबॉल क्लबचा माजी फुटबॉलपटू हमझा कोया यांचे कोरोनाच्या बाधेने निधन झाले. नेहरू चषक फुटबॉल स्पर्धेत हमझा कोया यांनी भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
1980 च्या दशकामध्ये त्यांनी कोलकात्यातील मोहन बगान आणि मोहम्मेडन स्पोर्टींग क्लबचे प्रतिनिधित्व केले. केरळमधील एका खासगी रुग्णालयात शनिवारी त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले.
कोया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 61 वषीय हमझा कोया हे मलबार विभागातील ज्ये÷ आणि अनुभवी फुटबॉलपटू म्हणून ओळखले गेले. संतोष करंडक स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्वही केले होते.
कालिकत विद्यापीठ फुटबॉल संघाचा ते माजी खेळाडू आहेत. 21 मे रोजी हमझा कोया आपल्या कुटुंबियांसह केरळमधील आपल्या निवासस्थानी दाखल झाले होता. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. हमझा यांना तसेच त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मोहम्मेडन स्पोर्टींग क्लब तसेच मोहन बागान आणि बंगाल फुटबॉल संघटनेतर्फे हमझा कोया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.