मौलाना तौकीर रजा यांची सून निदा खानने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या कार्यांमध्ये अत्यंत प्रभावित झाल्यानेच हा निर्णय घेतला आहे. तीन तलाक प्रकरणी भाजपने केलेले काम कौतुकास्पद आहे. माझ्या सासऱयांची कुठलीही इच्छा असो, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मुस्लीम महिला निश्चितपणे भाजपला पाठिंबा देणार असल्याचे निदा खान म्हणाली.
रविवारच्या दिवशी भाजपमध्ये अन्य पक्षांमधील एकूण 21 नेते सामील झाले आहेत. यात अनेक दिग्गज नेते आहेत. प्रवेश समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी लखनौमध्ये या सर्वांना पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले आहे.
मौलाना तौकीर रजा यांनी अलिकडेच काँग्रेसमध्ये पवश केला होता. याचमुळे त्यांच्या सूनेचा भाजपप्रवेश अधिक चर्चेत आला आहे. नरेंद्र मोदींच्या विचारसरणीमुळे प्रभावित होत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माझ्या भाजप प्रवेशानंतर अनेक मुस्लीम महिला पक्षाशी जोडल्या जातील असे निदा यांनी म्हटले आहे. भाजपच्या 5 वर्षांच्या शासनकाळात पलायन का केले नाही असा प्रश्न विचारत निदा खान यांनी प्रसिद्ध मुनव्वर राणा यांना लक्ष्य केले आहे.