ऑनलाईन टीम / ऑकलँड :
म्यानमारमधील लष्कराने लोकशाही सरकार उलथवून लावत एकहाती सत्ता हाती घेतल्याने तेथील लष्करावर चहुबाजूंनी टीका होत आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनीम्यानमारच्या लष्करी नेत्यांना न्यूझीलंडमध्ये प्रवेशबंदी करत म्यानमार बरोबरचे सर्व उच्चस्तरीय संबंध स्थगित केले आहेत.
आर्डन म्हणाल्या, म्यानमार लष्कराने चुकीच्या पद्धतीने सत्ता ताब्यात घेत देशातील महत्वाच्या नेत्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना लष्कराने तात्काळ सोडून द्यावे. म्यानमारमधील लष्करशाहीचे न्यूझीलंड कधीही समर्थन करणार नाही. आम्ही म्यानमारवर शाब्दिक टीका करणार नाही, थेट कारवाईच करू.
म्यानमारला जो निधी आम्ही देतो, त्याचा फायदा म्यानमारच्या लष्कराला मिळणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असेही आर्डन यांनी सांगितले.