सशस्त्र गटांकडून हल्ला : 30 सैनिक जखमी
यंगून : म्यानमारमध्ये सैन्यावर करण्यात आलेल्या भीषण हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला. तर 30 सैनिक जखमी झाले आहेत. सशस्त्र गटांच्या सदस्यांकडून मगवे भागातील गंगाव येथे हा हल्ला करण्यात आला आहे. 50 वाहनांचा समावेश असलेल्या सैन्याच्या ताफ्यावर हल्ला केल्याची माहिती हल्लेखोरांमध्ये सामील याव डिफेन्स फोर्सने दिली आहे. सैन्याच्या 18 वाहनांच्या एका अन्य ताफ्याला मंगळवारी लक्ष्य करण्यात आले. बिथरलेल्या सैन्याने कुख्यात सैन्य कमांडर लेफ्टनंट जनरल थान हलैंग यांना आता सशस्त्र गटांच्या विरोधातील कारवाईची जबाबदारी सोपविली आहे. मागील तीन महिन्यांमध्ये 1100 सैनिक मारले गेले आहेत. 1 फेब्रुवारी रोजी सैन्याची राजवट देशात लागू झाल्यापासून स्थिती अत्यंत बिघडली आहे.