ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जर आपण स्वस्त हँड सॅनिटायझर वापरत असाल तर सावध रहा. हे स्वस्त सॅनिटायझर आपल्याला हानी पोहोचवू शकते. कारण स्टेरॉइड्स व्यतिरिक्त धुळीचे कण आणि बाजारात मिळणारे बनावट किंवा स्वस्त सॅनिटायझर हे देखील म्युकरमायकोसिसला जबाबदार असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. या स्वस्त सॅनिटायझरमध्ये मिथेनॉलचे प्रमाण जास्त आहे. ज्यामुळे डोळे आणि नाकाच्या पेशी मारून बुरशी वाढण्यामध्ये चांगले वातावरण तयार होत आहे.
आयआयटी-बीएचयूचे सिरॅमिक इंजिनिअर्स विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रीतम सिंग म्हणाले, जेव्हा आपण स्प्रे सॅनिटायझर फवारतो तेव्हा त्यातील थोडे सॅनिटायझर आपल्या डोळ्यात आणि नाकात जाते. यामुळे नेत्रपटलासह डोळे आणि नाकातील पेशी मरतात. या सॅनिटायझरमध्ये जवळपास 5 टक्के मिथेनॉल असते, जे बुरशीसाठी चांगले वातावरण तयार करते. यामुळे डोळ्यांच्या रेटिनाचे नुकसान होते तसेच हळूहळू प्रकाश कमी होतो आणि त्या व्यक्तीला आंधळे केले जाते.