प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यातील आणखी एकाचा म्युकरमायसोसीसमुळे उपचारारदरम्यान मृत्यू झाला आह़े या रूग्णावर मुंबई येथे उपचार सुरु होते. आतापर्यंत जिह्यातील 3 जणांचा म्युकरमायसोसीसमुळे मृत्यू झालेल्यांची नोंद करण्यात आली आह़े दोघांवर जिल्हा शासकीय रूग्णालय येथे उपचार सुरु आहेत़
सोमवारी जिह्यामध्ये 429 नवे कोरोनाबाधित आढळून आले 22 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार सोमवारी 2 हजार 576 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 309 तर ऍन्टीजेन चाचणीत 120 कोरोनाबाधित आढळल़े यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 40 हजार 629 झाली आह़े जिह्यात सोमवारी 22 जणांच्या कोरोनामुळे मृत्यूंची नोंद झाली आहे. मृतांमध्ये शासकीय रूग्णालयांमध्ये 9 तर विविध खासगी रूग्णालयांमध्ये 13 मृत्यू झाले आहेत.
जिह्यातील मृतांची एकूण संख्या आता 1 हजार 378 झाली आह़े मागील 24 तासात कोरोनापामुक्त झालेल्या 552 जणांना घरी सोडण्यात आल़े यामुळे जिह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 34 हजार 764 व बरे होण्याचे प्रमाण 85.56 झाले आह़े रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर अजूनही चिंताजनक म्हणजे 3.39 असून पॉझिटिव्हीटी रेटही 17.80 आह़े