मुंबई
म्युच्युअल फंड कंपन्यांनी विक्रीचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. आठव्या सलग महिन्यात विक्रीवर भर दिसत असून म्युच्युअल फंड कंपन्यांनी जानेवारीत समभाग विक्रीतून 12980 कोटी रुपये काढले असल्याचे समजते. शेअर बाजार तेजीत होता तेव्हा अनेकांनी नफावसुलीवर जोर दिला होता. बाजारात समभागात गुंतवणूक करण्याचा पर्याय अनेकांना आकर्षक वाटतो आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांनी 2020 मध्ये समभागांच्या माध्यमातून 56 हजार 400 कोटी रुपये काढले असल्याचे सांगण्यात येते.