वृत्तसंस्था/ म्युनिच
जॉर्जियाच्या निकोलोझ बॅसिलाश्वेलीने रविवारी येथे एटीपी टूरवरील म्युनिच कलेकोर्ट पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविताना जर्मनीच्या स्ट्रफचा पराभव केला. एटीपी टूरवरील स्पर्धेतील बॅसिलाश्वेलीचे हे पाचवे तर 2021 च्या टेनिस हंगामातील दुसरे जेतेपद आहे.
रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात 29 वर्षीय बॅसिलाश्वेलीने जर्मनीच्या 31 वर्षीय स्ट्रफचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव केला. चालू वर्षांच्या प्रारंभी बॅसिलाश्वेलीने कतारमधील टेनिस स्पर्धा जिंकली होती. तसेच त्याने 2018 आणि 2019 साली हॅम्बुर्ग क्लेकोर्ट टेनिस स्पर्धा जिंकल्या होत्या.