डिचोली/प्रतिनिधी
डिचोली येथील प्रसिध्द चित्रकार श्री प्रसाद नाईक यांची मुलाखत पणजी दुरदर्शनच्या कलाविष्कार या कार्यक्रमात बुध. दि. 29 सप्टें. रोजी संध्या. 6 वा. प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत प्रसाद नाईक यांनी वेगवेगळय़ा पेंटिंग कला ज्यात म्युरल पेंटिंग बध्दल उलगडा केला आहे. त्यांची सदर मुलाखत डॉ. प्रवीण सावंत यांनी घेतलेली आहे. या कार्यक्रमाची निर्मिती गोवा दुरदर्शनचे अधिकारी राजेंद्र फडते यांनी केली आहे.
प्रसाद नाईक हे एक प्रसिध्द चित्रकार असून त्यां?ई गेली 30 वर्षे डिचोलीतील राधाकृष्ण विद्यालयात चित्रकार शिक्षक म्हणून विद्यादान केलेले आहे. ते एक उत्कृष्ट समाजसेवक असून त्यां?नी 2019 – 20 साली गोव्यातील सम्राट क्रब इंटरनेशनचे अध्यक्षपद भुषविले आहे. ते एक उद्योजकही असून त्यांनी चित्रकला आजतागायत जिवंत ठेवली आहे. हल्लीच त्यांनी पणजी येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा येथे आपल्या पेंटिंगचे प्रदर्शन भरविले होते. त्यास भरघोस प्रतिसादही लाभला होता.