ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून मुंद्रा बंदरात येणारा माल 15 नोव्हेंबरपासून न हाताळण्याचा निर्णय अदानी पोर्ट्सने घेतला आहे. मुंद्रा बंदरात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आल्यानंतर अदानी समुहाने हा निर्णय घेतला आहे. अदानी पोर्ट्स आणि लॉजिस्टिकने यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे.
गुजरातमधील मुंद्रा बंदरात 13 सप्टेंबरला अदानी ग्रुपच्या दोन कंटेनरमधून तीन हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. हा साठा अफगाणिस्तानातून आला होता. इराण आणि पाकिस्तानमधून आलेल्या कंटेनर्समधूनही यापूर्वी अमली पदार्थ आढळून आले होते. त्यामुळे 15 नोव्हेंबरपासून एपीएसईझेड इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून येणाऱया ‘एक्झिम’ कंटेनरकृत कार्गो हाताळू शकणार नाही, असे अदानी स्पोर्टने म्हटले आहे. ही सूचना ‘एपीएसईझेड’द्वारे संचलित सर्व टर्मिनल्सना आणि त्रयस्थ टर्मिनल्ससह एपीएसईझेड बंदरांमध्ये पुढील सूचना येईपर्यंत लागू असणार आहे.