ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका आणि जावई जॅरेड कुशनर शाळा प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करत होते. यासंदर्भात शाळेने चिंता व्यक्त करत नोटीस धडल्यानंतर इव्हांका-जॅरेड यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना शाळेतून काढून टाकले. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
इव्हांका-जॅरेड यांची तिन्ही मुले वॉशिंग्टनमधील पॉश नावाच्या शाळेत शिकत होते. शाळा प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना निर्बंधाचे इव्हांका आणि जॅरेड कुशनर पालन करत नसल्याने शाळेतील इतर मुलांच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने अल्पवयीन मुलांची सुरक्षितता आणि खासगीपणाबद्दल चिंता व्यक्त करत इव्हांका-जॅरेड यांना यासंदर्भात नोटीस दिली. त्यानंतर इव्हांका-जॅरेड यांनीच आपल्या तिन्ही मुलांना शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत घातले.