परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या विशिष्ट निवडींसाठी आणि उत्तम कंटेंटसाठी ओळखला जातो. जर आमिर एखाद्या गोष्टीची शिफारस करत असेल तर आपण ते नक्कीच गांभीर्याने घेऊ. काही काळापूर्वी त्याचे आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यात असेच काहीसे घडले होते.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ या चित्रपटाची शिफारस आमिरनेच ‘बिग बीं’कडे केली होती आणि त्यांना त्यासाठी तयार देखील केले होते. होय, तुम्ही योग्य तेच वाचले आहे! ‘झुंड’ चित्रपट फ्लोअरवर जाण्यापूर्वी, आमिरने चित्रपटाची क्रिप्ट ऐकली आणि त्याने तो इतका प्रभावित झाला की त्याने मिस्टर बच्चन यांना चित्रपट करण्याची शिफारस केली आणि ते त्यासाठी कसे योग्य आहेत हे पटवूनही दिले. अमिताभ हे झुंडसाठी एक परिपूर्ण निवड आहेत, याची आमिरला खात्री होती.
याबद्दल अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘मला आठवते जेव्हा मी आमिरशी याविषयी चर्चा केली होती; त्याने मला मी हा चित्रपट करायलाच हवा असे सांगितले. आणि जेव्हा आमिर एखाद्या गोष्टीची शिफारस करतो तेव्हा काय होते हे तुम्हाला माहिती आहे.’
अलीकडेच, आमिरने एका स्पेशल क्रिनिंगमध्ये हा काळजाला हात घालणारा चित्रपट पाहिला ज्यामुळे तो भावनिक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. याबद्दल बोलताना आमिर म्हणाला, ’या चित्रपटाचे कौतुक करताना आमिर खान म्हणाला की, ‘हा चित्रपट पाहून मी भारावून गेलो आहे. अक्षरशः मी निःशब्द झालो आहे. नागराज यांनी मुलामुलींच्या भावना ज्याप्रकारे पडद्यावर दाखवल्या आहेत, त्या मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. चित्रपटात मुलांनी दमदार अभिनय केला आहे. चित्रपटाचे जेवढे कौतुक करावे ते कमी आहे.