मुंबई/प्रतिनिधी
१०० कोटींच्या वसुलीप्रकरणी (Money laundering case) अनिल देशमुख (anil deshmukh) यांना ईडीने (ED) वारंवार समन्स बजावलं होतं. वारंवार समन्स बजावूनही ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नव्हते. अनेक दिवसांपासून बेपत्ता असणारे अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर झाले. उच्च न्यायालयाने (high court) कोणताही दिलासा देणार नसल्याचे स्पष्ट झाल्यांनतर ते आज ईडी कार्यालयात दाखल झालेत. इतके दिवस शांत बसलेल्या देशमुखांनी आज अखेर या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
”ईडीने मला समन्स बजावले त्यावेळी मी ईडीला सहकार्य करत नाही, अशा चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमात आल्या. पण त्यावेळी मी त्यांना सांगतले होते, की उच्च न्यायालयात माझी याचिका होती. तसेच सर्वोच्च न्यायालयातही माझी याचिका आहे. त्याचा निकाल लागल्यावर मी स्वतः हजर राहणार, असं ईडीला सांगितलं होतं. ईडीने माझ्या सर्व घरावर छापे टाकले. त्यावेळी मी आणि माझ्या परिवाराने त्यांना योग्य सहकार्य केले. जेव्हा सीबीआयचे (CBI) दोन समन्स आले तेव्हा कार्यालयात जाऊन मी सहकार्य केले. अजूनही सर्वोच्च न्यायालयात माझी याचिका प्रलंबित आहे. तरी मी आज ईडीच्या कार्यालयात दाखल झालो आहे,” असे देशमुख म्हणाले.